मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

राज्यातील अनेक गावात आजही स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांनी नेहमीच फरफट होते. म्हणजे माणूस गेल्याचं दु:खापेक्षा मरणानंतरही त्याला कष्ट पडावे या विचारानेच ग्रामस्थांचा संताप होतो. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी किंवा शेड नसल्यामुळे मृतदेह उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ठेवावे लागतात.
असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील मदनापूर येथे. मदनापूरमधील ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत परिसरातच मृतदेहावर अंत्यसंस्कार गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच वडिलांवर अंत्यसंस्कार

गावात स्मशानभूमीची सुविधा नसल्याने 81 वर्षीय वृद्धावर चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मदनापूर येथील रामदास पुरुषोत्तम मानकर यांचे निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी अधिकृत स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांपुढे मोठा प्रश्न होता. अखेर त्यांचा मुलगा विजय मानकर यांनी संतप्त होत वडिलांवर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे आवारच अंत्यसंस्कार करण्यात आले.

30 गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नाही

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,मदनापूरसह परिसरातील सुमारे 30 गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नाही. अनेक वर्षांपासून निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने करूनही शासन आणि प्रशासनाकडून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे गावात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे याचाही विचार ग्रामस्थांना करावा लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्देव ते काय असू शकतं.

आता तरी संबंधित प्रशासन जागे होणार का?

एवढंच नाही तर शिवसेना आमदार संजय दरेकर नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून शासनाकडे स्मशानभूमीसाठी जागा व निधीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.मात्र आता या घटनेनंतर तरी राज्य सरकार आणि संबंधित प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार