चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी गणेशोत्सवासानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट

सर्वजण ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहतायत तो म्हणजे गणेशोत्सव.सर्वजण आपापल्या घरी बाप्पााच्या आगमनासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.एवढंच नाही तर, गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. कारण गणेशोत्सवाला लाखो चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. विशेषत: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते.

त्यामुळे यंदाच्या सणात कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि नोकरदारांची होणारी तुफान गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पुणे ते रत्नागिरी दरम्यान 10 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचे अधिकृत आरक्षण 1 ऑगस्ट 2026 पासून प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना ऐनवेळी होणाऱ्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

वातानुकूलित आणि विशेष फेऱ्या

कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी होणारी ओढाताण थांबवण्यासाठी या विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या 10 फेऱ्यांमध्ये ‘पुणे-रत्नागिरी एसी वीकली स्पेशल’ आणि ‘पुणे-रत्नागिरी वीकली स्पेशल’ अशा दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील ट्रेन्सचा समावेश असेल. गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत या गाड्या धावणार आहेत.

गणपती उत्सवात कोकण प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने पुणे-रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये आरामदायी प्रवासासाठी AC वीकली स्पेशल आणि सामान्य प्रवाशांसाठी साध्या डब्यांची स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार असून, यामुळे सणासुदीत कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल.

प्रवासाची वेळ आणि प्रमुख स्थानके

पुण्यातील आयटी व्यावसायिक आणि चाकरमान्यांना वीकेंडला गावी जाता यावे, यासाठी या गाड्यांच्या वेळा अत्यंत सोयीस्कर ठेवण्यात आल्या आहेत.

पुण्याहून सुटण्याची वेळ :
ही विशेष ट्रेन मध्यरात्री 12:25 वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीत दाखल होईल.

रत्नागिरीहून परतण्याची वेळ : परतीच्या प्रवासात ही गाडी संध्याकाळी 05:50वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05:20 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

कुठे थांबणार? : प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, चिपळूण आणि संगमेश्वर रोड या प्रमुख स्थानकांवर थांबेल.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात 246 गणपती स्पेशल ट्रेन्स चालवल्या जात आहेत. यामध्ये मुंबई म्हणजे CSMT आणि LTT येथून 174 फेऱ्या, पुण्यातून 10 फेऱ्या आणि दिवा स्थानकावरून सुटणाऱ्या 62अनारक्षित मेमू गाड्यांचा समावेश आहे.

खाजगी बस चालकांकडून सणासुदीच्या काळात होणारी भाडेवाढ आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता, रेल्वेने केलेला हा पर्याय सर्वसामान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरेल.

तिकीट बुकींग कधीपासून सुरु?

या विशेष गाड्यांचे बुकिंग 1 ऑगस्टपासून IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, ऐनवेळची गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी आपले आरक्षण वेळेत पूर्ण करून घ्यावे. या सुविधेमुळे यंदा पुण्यातील लाखो गणेशभक्तांचा कोकणातील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुटसुटीत होईल.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    तुकाराम मुंढेंचा दणका; FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

    अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरू आहे.अन्न आणि औषध विभागाच्या धडक कारवाईमुळे सध्या फूड विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अस्वच्छ…

    भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, अनेकजण जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठी दुर्घटना घडली आहे. नारपोली गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली अतिधोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान कोसळली आहे. या दुर्घटनेत 9…

    Leave a Reply

    You Missed

    तुकाराम मुंढेंचा दणका; FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

    तुकाराम मुंढेंचा दणका; FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

    भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, अनेकजण जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, अनेकजण जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी गणेशोत्सवासानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट

    चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी गणेशोत्सवासानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट

    वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च नाही तर समाजकल्याण; 60 विद्यार्थ्यांना जेवणाची ताट ,शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप

    वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च नाही तर समाजकल्याण; 60 विद्यार्थ्यांना जेवणाची ताट ,शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप

    कार्यकर्ता ते उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपद! अ‍ॅड. विक्रम कपूर यांचा यशस्वी राजकीय आणि सामाजिक प्रवास, कार्याचा काँग्रेसकडून सन्मान

    कार्यकर्ता ते उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपद! अ‍ॅड. विक्रम कपूर यांचा यशस्वी राजकीय आणि सामाजिक प्रवास, कार्याचा काँग्रेसकडून सन्मान

    अभिजीत दिपके लवकरच लग्नबंधनात अडकणार? आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या दोन वर्षांपासून त्याचे …

    अभिजीत दिपके लवकरच लग्नबंधनात अडकणार? आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या दोन वर्षांपासून त्याचे …

    डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

    डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

    कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

    कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर