राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांसाठी पावसाचा मोठा इशारा दिला. सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये तब्बल 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे देखील संततधार सुरूच आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

मराठवाड्यासाठी दिलासादायक पाऊस

संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.
विदर्भातही पावसाने चांगली हजेरी लावली. सर्वत्र समाधानकारक पाऊस असून पिकेही चांगली आलीत.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला पाऊस 

राज्यात गुरूवारी 65 किलोमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. आता पावसाचा जोर कमी होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. पण पाऊस अधिक कोसळत आहे. जून महिना कोरडा केला पण जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला पाऊस होतोय.

उत्तरेकडे मात्र पावसाचा हाहाकार 

गुरुवारी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकलेल्या मान्सूनमुळे मोठा पाऊस झाला. उत्तरेकडे पावसाने हाहाकार घातला. अनेक कुटुंबांवर यामुळे मोठे संकट ओढवले. या पावसामुळे मेरठ, आग्रा, अलीगड आणि प्रयागराज यांसारख्या शहरांमधील कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 6 अंश सेल्सिअसने खाली आले. मुसळधार पावसामुळे घरे कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला.

नागपूर हवामान विभागाचा इशारा

नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात आज शुक्रवारी पावसाचा इशारा देण्यात आला. नागपूर हवामान विभागाने दिला इशारा. काही जिल्ह्यांना साधारण पावसाचा इशारा तर अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला. नागपुरात सकाळपासून पावसाचं आणि ढगाळ वातावरण, काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात. हा पाऊस शेतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, विदर्भात पाऊस चांगला झाला. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर होते. पण दमदार पाऊस राज्यभरात कोसळताना दिसला.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…

१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

१६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू, भगिनी आणि सहकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातर्फे तथा भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…

Leave a Reply

You Missed

“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

“दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

“दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण