SIR च्या आड अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा की सरकारचं नियोजनच चुकीचं? के-पश्चिम वॉर्डमधील ढिसाळ कारभारावर नागरिकांचे प्रश्न

देशात एकीकडे कोट्यवधी तरुण रोजगाराच्या शोधात भटकत असताना, दुसरीकडे सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्याऐवजी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण टाकला जात आहे. शिक्षक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर जनगणना, SIR नोंदणी यांसारख्या बिगर-प्रशासकीय कामांची जबाबदारी सोपवली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियमित कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला असून याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.प्रशासनाच्या नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

के-पश्चिम वॉर्डात तक्रारींचा खच; RTI अर्जांनाही उत्तर मिळेना

अंधेरी पश्चिम येथील के-पश्चिम वॉर्डमध्ये आरोग्य विभाग, इमारत व कारखाने विभाग आणि कर विभाग अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये नागरिकांच्या हजारो तक्रारी प्रलंबित आहेत. आपल्या रास्त मागण्या आणि समस्या घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. एवढेच नाही तर प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणाऱ्या माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीलाही वेळेत उत्तरे दिली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कार्यवाही पारदर्शकपणे न करता प्रकरणे दडपली जात असल्याचे आरोप

याशिवाय काही तक्रारींमध्ये अधिकाऱ्यांकडून तक्रारींवर परस्पर नोटिसा काढून त्या प्रकरणांची पुढील कार्यवाही पारदर्शकपणे न करता प्रकरणे दडपली जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. काही नोटिसांवर पदनिर्देशित किंवा जबाबदार अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसतानाही त्या अवैध हॉटेल, अवैध इमारत बांधकाम करणाऱ्यांना देऊन त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात असल्याचेही आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. या आरोपांची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

स्वतंत्र ऑडिट करण्याची नागरिकांची मागणी

त्यामुळे गेल्या एक वर्षात के-पश्चिम विभागात किती नागरिकांच्या तक्रारी आणि RTI अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी किती अर्जांना नियमानुसार वेळेत उत्तर देण्यात आले, किती अवैध हॉटेल्स व बांधकामांवर नोटिसा बजावण्यात आल्या आणि नोटिसांनंतर प्रत्यक्ष किती प्रकरणांमध्ये कारवाई झाली, याचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वॉर्डातील वाढता भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा रोखण्यासाठी नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. SIR किंवा इतर अतिरिक्त जबाबदाऱ्यांच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत तक्रारी व प्रशासकीय कामे प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी महापालिका प्रशासनाने स्पष्ट नियोजन करावे, अशी मागणीही आता जोर धरत आहे.

नागरिकांचा थेट सवाल, दोष कर्मचाऱ्यांच्या नियतीचा की सरकारच्या नियोजनाचा?

SIR नोंदणी किंवा इतर अतिरिक्त जबाबदाऱ्यांच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि प्रशासकीय कामे प्रलंबित ठेवणे अयोग्य आहे. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ स्पष्ट नियोजन करणे आवश्यक आहे. आता “हा अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा आहे की सरकारने केलेले मनुष्यबळाचे चुकीचे नियोजन?” असा सवाल नागरिकांकडून थेट विचारला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि शासनाने यावर तातडीने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    भयानक! दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

    भयानक!  दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही