ऐन सणा-सुदीच्या काळात साखरेने सर्वसामान्यांचं बजेट चांगलंच बिघडवलं आहे. सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी घेतली. साखरेच्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ ठोक बाजारात झाली आहे. साखरेची किंमत ७,५०० प्रति क्विंटलवर गेली आहे. गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे.
साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली
सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ ठोक बाजारात झाली आहे. तर वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्यात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, साखरेच्या होलसेल दराने गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार रुपयाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. साखरेच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ व्यापार्यांसह ग्राहकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. तर, काल 19 ऑगस्ट सायंकाळच्या सुमारात होलसेल साखरेचे दर बघितले तर क्विंटल मागे 6 हजार 500 रुपयांवर पोहोचले होते. याच दरात आता मोठी वाढ झाली आहे. आता ही भाववाढ झाल्याने सामान्यांच्या घरातील बजेट कोलमडणार आहे.
साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. या काळातच साखरेच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरम्यान, अचानक साखरेच्या दरात नेमकी का वाढ होत आहे? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
साखरेच्या दरात का वाढ होण्याचं कारण?
दरम्यान, साखरेच्या दरात का वाढ होत आहे, याबाबतची माहिती काही अभ्यासकांनी दिली आहे. त्यांच्या मत साखरेच्या दरवाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे कारखान्यांकडील साठ्याची कमतरता. साखर कारखान्यांकडे साखरेच्या साठ्याचे प्रमाण कमी झालं आहे. याचा परीणाम पुरवठ्यावर होत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेल्या 2025-26 च्या हंगामात, देशातील साखरेचा वापर उत्पादनापेक्षा जास्त झाला. यामुळे कारखान्यांकडील उपलब्ध साठा हळूहळू कमी होऊ लागला. काही तज्ज्ञांच्या मते, सरकारने उत्पादनाच्या अंदाजानुसार 1.5 ते 2 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. नंतर ही मर्यादा वाढवून 2 दशलक्ष टन करण्यात आली. निर्यातबंदीपूर्वी, अंदाजे 8 लाख टन साखरेची निर्यात आधीच झाली होती.दरम्यान, सरकार साखर आयात करण्याचा विचार देखील करत आहे.








