गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

मु्ंबईतील भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर सगळेच गणेशभक्त हादरले आहेत. सर्वच मुंबईकरांच्या मनातून ती घटना पुसली जाणे अशक्य आहे. या घटनेनंतर बीएमसी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी मूर्तीच्या वजनाबाबत नवीन नियम लागू केलाय.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे मोठे पाऊल

गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता एक टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.

नवीन नियमांमुळे मोठ्या अन् वजनदार गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांचा धोका टळणार 

या नवीन नियमांमुळे मोठ्या आणि वजनदार गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांचा धोका टाळता येणार आहे. जड मूर्तीच्या आगमनादरम्यान अपघातांचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात एक विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी डीएमसी झोन २ चे अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत मूर्तीची सुरक्षा, योग्यता प्रमाणपत्रे आणि त्यांच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश

तर गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना आणि आगमन मिरवणुकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कडक पावले उचलली आहेत. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनासाठी वापरले जाणारे सर्व प्रमुख रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. रस्ते विभाग आणि सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश मिळालेत.

भुलेश्वरच्या महाराजाला आणताना मोठी दुर्घटना

22 ऑगस्ट रोजी भुलेश्वर येथील भुलेश्वरच्या महाराजाला आणताना मोठी दुर्घटना घडली होती. या २२ फूटांच्या भव्य मूर्तीला भायखळा ते भुलेश्वर असे आणताना ही मूर्ती एका बाजूला कोसळल्याने पाच जण जखमी झाले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना मंडपाच्या अवघ्या ५०-६० मीटर आधी घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे नव्हते. मात्र, मूर्तीचा बोल्ट तुटल्याने ही मूर्ती कोसळल्याचे उघडकीस आले होते.

भुलेश्वरच्या घटनेनंतर गणेशमूर्तीच्या उंचीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह 

या घटनेनंतर गणेशमूर्तीच्या उंचीबद्दल पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहेत. यामुळे बीएमसीच्या या नवीन फिटनेस प्रमाणपत्राच्या आणि सुरक्षिततेच्या नियमांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    ऑनलाइन किराणा आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून घरगुती वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. अन्न सुरक्षा विभागाने ऑनलाइन किराणा आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विषारी धोतराच्या विक्रीबाबत कठोर कारवाई केली…

    आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

    आदगाव कुणबीवाडी मुंबई मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील बोरिवली येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत…

    Leave a Reply

    You Missed

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

    आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

    मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

    नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

    नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

    अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

    अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत