उकाड्याने मुंबईकर बेजार; राज्यात पाऊस गायब, महाराष्ट्रातील हवामानाची सध्य स्थिती काय?

महाराष्ट्रात पावसाचा जोर हळू हळू कमी होऊ लागला आहे. अचानक पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर काही भागांत पावसाची मध्यम स्थिती जाणवण्याची अधिक शक्यता आहे. तर काही भागांत विजांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. पाऊस हुलकावणी देत आहे. पावसाअभावी पीके सूक लागल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. राज्यात पावसाची सध्या स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात.

कोकण

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. तर नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाची पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव आणि बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. लातूर, हिंगोली आणि नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात गेल्या वीस दिवसांपासून पावसाची कमतरता जाणवत आहे. परिणामी, उडीद, मूग, मका आणि सोयाबीन यांसारख्या सर्वच पिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विदर्भ

हवामान विभागाने विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा कोणताही अंदाज वर्तवलेला नाही.

पावसाच्या या अशा चित्रामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. एवढंच नाही तर काही शहरात फक्त ढगाळ वातावरण होत असून पाऊस पडत नसल्यामुळे वातावरणातील दमटपणा आणि उष्णता हळू हळू जाणवू लागली आहे. विशेषत: मुंबईसारख्या शहरात.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पात्र लाभार्थी महिलांसाठी सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात येत्या दोन ते…

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    मु्ंबईतील भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर सगळेच गणेशभक्त हादरले आहेत. सर्वच मुंबईकरांच्या मनातून ती घटना पुसली जाणे अशक्य आहे. या घटनेनंतर बीएमसी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित…

    Leave a Reply

    You Missed

    उकाड्याने मुंबईकर बेजार; राज्यात पाऊस गायब, महाराष्ट्रातील हवामानाची सध्य स्थिती काय?

    लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

    लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

    नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

    नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

    आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द