सध्या सर्वञ गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे.सगळेजण घराची साफसफाई ते मखरापर्यंतची सगळी तयारीत आहेत. सोबतच बाप्पाच्या स्वागतासाठी,पूजेसाठी लागणारे साहित्याची यादी करण्याची तयारी सुरु आहे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे बाप्पाला घरी आणताना मूर्तीला झाकण्यासाठी असणारे उपर्ण किंवा रुमाल. जवळपास सर्वजणच जण बाप्पाला घरी आणताना मूर्तीचा चेहरा झाकून आणली जाते. पण कधी विचार केला आहे की यामागे नक्की काय कारण असू शकतं? धार्मिक महत्त्व, परंपरा, श्रद्धा काय? जाणून घ्या… चला जाणून घेऊयात.
बाप्पाला घरी आणताना रुमालाने का झाकतात?
अनेकदा आपण पाहतो, गणेशोत्सवात गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना अनेक ठिकाणी मूर्तीवर स्वच्छ रुमाल किंवा वस्त्र झाकण्याची परंपरा आहे. मात्र ही पद्धत सर्वत्र बंधनकारक धार्मिक विधी नसून स्थानिक आणि कौटुंबिक परंपरेचा भाग आहे. यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया…
मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी
गणपतीची मूर्ती घरी आणताना तिच्यावर वस्त्र झाकणे हे देवतेला आदर देण्याचे प्रतीक मानले जाते. मूर्तीची स्थापना होईपर्यंत तिचे पावित्र्य आणि सन्मान राखण्याची भावना त्यामागे असते.
दृष्ट लागू नये, अशी श्रद्धा
काही भागांत बाप्पाला रुमालाने झाकण्यामागे वाईट नजर लागू नये अशी श्रद्धा असते.विशेषतः सजवलेली सुंदर मूर्ती मिरवणुकीतून घरी आणताना ही पद्धत केली जाते.
स्थापना होईपर्यंत मूर्ती झाकण्याची प्रथा
घरातील पूजेच्या जागेवर बाप्पाची विधिवत स्थापना होईपर्यंत मूर्तीवर वस्त्र ठेवले जाते. स्थापना झाल्यानंतर रुमाल काढून बाप्पाचे दर्शन घेतले जाते.
तर…गणेशपूजा अपूर्ण ठरणार का?
धर्मग्रंथांमध्ये ‘गणपती घरी आणताना रुमालाने मूर्ती झाकणे अनिवार्य आहे’ असा सार्वत्रिक नियम नाही. त्यामुळे ही प्रथा श्रद्धेने पाळता येते. न पाळल्याने गणेशपूजा अपूर्ण ठरते, असंं काहीही मान्यता नसते.
बाप्पाला घरी आणल्यावर रुमाल कधी काढावा?
घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणताना रुमाल/ उपर्ण झाकण्याची प्रथा काही घरांमध्ये असते
तो रुमाल मुख्यतः बाप्पांना नजर लागू नये, प्रवासात मूर्तीवर धूळ-माती पडू नये
तसेच बाप्पांचे आगमन मंगल पद्धतीने व्हावे या श्रद्धेमुळे झाकतात
घरी पोहोचल्यानंतर, स्थापना करण्यापूर्वी रुमाल काढतात
त्यानंतर बाप्पांचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा व प्राणप्रतिष्ठा केली जाते
ही प्रथा सर्व ठिकाणी किंवा प्रत्येक कुटुंबात सारखी नसते, घरच्या परंपरेनुसार पद्धत बदलू शकते
गणेश चतुर्थीची पूजा, स्थापनेचा शुभ मुहूर्त….
पंचांगानुसार गणेश चतुर्थीची चतुर्थी तिथी 14 सप्टेंबरच्या सकाळी सुरू होते आणि गणेशपूजेसाठी दुपारच्या सुमारास मुहूर्त आहे
गणेश चतुर्थीची पूजा/स्थापना मुहूर्त – पंचांग गणनेनुसार, सकाळी 11:16 ते 1:44 दुपारी असा आहे
विविध पंचांगांमध्ये गणेशपूजेचा मुहूर्त साधारण सकाळी 11 ते दुपारी 1.30 या कालावधीत दिला आहे
आधी कोणती पूजा? हरतालिका कि गणेश चतुर्थी?
यंदा हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थीच्या पूजेचे नियोजन एकाच दिवशी करावे लागणार आहे. विशेषतः हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिलांसाठी पूजा कधी करायची? उपवास कधी सोडायचा, तसेच गणेशस्थापना आणि पूजा कोणत्या क्रमाने करायची, याबाबत घरच्या परंपरेनुसार नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
14 सप्टेंबर 2026, सोमवार
सकाळी हरतालिका व्रताची पूजा करावी.
त्यानंतर गणेश चतुर्थीची स्थापना आणि पूजा करावी.
हरतालिका व्रताचा संकल्प असल्यास दिवसभर उपवास सुरू ठेवावा.
15 सप्टेंबर 2026, मंगळवार सकाळी स्नान करून हरतालिकेची उत्तरपूजा केल्यानंतर पारणे करावे.








