भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

आज ११ दिवसांनी सर्व गणेशभक्तांकडून गणपती बाप्पाला जड मनाने निरोप दिला. मुंबई, पुण्यासह सर्व राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह दिसून आला. सर्वच घरगुती आणि मंडळाच्या गणरायांचे आज विसर्जन करण्यात आलं पण अशातच एक मनाला चटका लावणारी घटना घडली. विसर्जनादरम्यान २१ फूट उंच मूर्ती कोसळल्याची घटना घडली.

विसर्जनादरम्यान २१ फूट उंच मूर्ती कोसळली

ही दुर्देवी घटना कोल्हापुरात एक घडली आहे. विसर्जनादरम्यान २१ फूट उंच मूर्ती कोसळली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र गणरायाला अखेरचा निरोप देतानाच ही घटना घडल्याने गणेशभक्तांमध्ये हळहळ पाहायला मिळत आहे. कोलहापुरातील वाय. पी. पोवार नगर मंडळाची ही २१ फुटी उंच भव्य मूर्ती होती. ही बॅलेन्सिंग गणेशमूर्ती होती. एका पायावर उभी असणारी ही मूर्ती पुढील बाजूला झुकलेली होती. ट्रॉलीमधून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेली जात होती. गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नेलं जात असताना गोखले कॉलेज चौकात मूर्ती कोसळली. सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. मिळालेलेल्या एका विद्युत तारेचा स्पर्श झाला अन् मूर्तीला कोसळल्याचं बोललं जातं.

महावितरणने हा आरोप फेटाळला

मूर्ती कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी काही अनुचित घडणार नाही याची काळजी घेत गर्दी नियंत्रणात आणली. तसंच तात्काळ मदतकार्य सुरू केलं. दुर्घटनेनंतर गणेशमंडळाने महावितरणावर आरोप केलं आहे. विसर्जन मार्गातील वायर, झाडाच्या फांद्या हटवण्यासंदर्भात विनंती केल्यानंतरही त्याची पूर्तता न झाल्याने हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र महावितरणने हा आरोप फेटाळला आहे.

मुंबईतील भुलेश्वलरची पुनरावृत्ती

मुंबईतील प्रसिद्ध ‘भुलेश्वरचा राजा’ गणपतीची २२ फूट उंच मूर्ती २२ ऑगस्ट २०२६ रोजी आगमन सोहळ्यादरम्यान अचानक कोसळली. या दुर्दैवी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले.

२२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० ते १० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील भुलेश्वर भागातील जय आंबे चौकात ‘भुलेश्वरचा राजा’ मूर्तीचा आगमन सोहळा सुरू होता. मूर्ती भायखळ्यातील कार्यशाळेतून मंडपाकडे आणली जात असताना, मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर ती अचानक असंतुलित होऊन भाविकांवर कोसळली.

धारावी आणि मालाडमध्येही कोसळली मूर्ती

याशिवाय कुर्ला आणि मालाडमध्येही गणेशमूर्ती कोसळल्याची घटना घडली होती. कुर्ला येथील ‘प्रेम नगरचा महाराजा’ मूर्ती ८ सप्टेंबर ला कोसळली होती. प्रेम नगर मित्र मंडळ’ ची १५ फूट उंच असलेली गणेशमूर्ती ट्रॉलीवरून मंडपाकडे नेली जात होती. शीतल तलावाजवळ अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली. घटनेत ३ कार्यकर्ते जखमी झाले. खराब स्पीडब्रेकर आणि खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळल्याचा आरोप करण्यात आला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    रिक्षातून किंवा व्हॅनमधून आपल्या मुलांना शाळेत पाठवताना पालकांना किती विश्वास असतो. पण आता भिवंडीतील एका घटनेमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीच्या रोशन बाग परिसरातून एक…

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    १० दिवसांच्या मनोभावे पूजेनंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण आला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मुंबईतील…

    Leave a Reply

    You Missed

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार

    अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा