२० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती लालाबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. विसर्जनावेळीही त्याहून दुप्पट गर्दी पाहायला मिळते. यंदाही लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर जमा झाले आहेत. सोबतच यावर्षीही लालाबागचा राजाची विसर्जन मिरवणूक 20 तासांनंतर चौपाटीवर पोहोचली आहे.

दाही राजाच्या विसर्जनाला विलंब

ढोल-ताशांच्या गजरात, भावपूर्ण वातावरणात निघालेली लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या आसपास पोहोचली आहे. लवकरच विसर्जन होणार असल्यामुळे लाखो भाविकांनी राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राजा कित्येक तास चौपाटीवर होता

गेल्या वर्षी लालबागचा राजा कित्येक तास चौपाटीवर होता. समुद्राला आलेल्या भरतीमुळे गणेशमूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढविताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. यंदा देखील असेच काहीसं होत असल्याचं दिसून आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार आज समुद्राला पहिली ओहोटी पहाटे ०५:२२ वाजता आली आहे. त्यावेळी पाण्याची पातळी केवळ ०.९७ मीटर इतकी होती. ओहोटीच्या काळात समुद्राची पातळी खूप खाली जाते. त्यामुळे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची खोली उपलब्ध होत नाही.

कोळीबांधवाच्या मदतीने लालबागच्या राजाचे विसर्जन होणार

गिरीगाव चौपाटी किंवा गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी गणपती विसर्जन करताना पाण्याची पातळी पुरेशी असावी लागते. ओहोटी असल्यास मूर्ती समुद्रात विसर्जीत करणं कठीण होतं आहे. त्यामुळे लाडक्या राजाच्या विसर्जनासाठी सगळेच भक्त चौपाटीवर आहेत. दरम्यान यावर्षीही स्थानिक कोळीबांधवाच्या मदतीने लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे. स्थानिक कोळीबांधवांना भरती ओहोटीचा अंदाज असल्याने त्यांच्याकडून विसजर्न करणार आहेत

गेल्या वर्षी 33 तासांनंतर विसर्जन

2025 साली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. मात्र भरतीमुळे अत्याधुनिक तराफा तरंगत राहिला आणि लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या. मंडळाने पाणी ओसरण्याची वाट पाहिली आणि कोळी बांधवांशी चर्चा करून भरतीदरम्यान विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला.

लालाबागचा राजा हा मुंबईचा सांस्कृतिक वारसा आहे. त्याच्या विसर्जनाला लाखो लोकांचे भावविश्व जोडलेले आहे. ओहोटीसारख्या नैसर्गिक घटकांमुळे अडचणी येणे स्वाभाविक आहे. मात्र प्रशासन, स्वयंसेवक आणि भाविक यांच्या सहकार्याने विसर्जन सुरक्षितपणे पूर्ण होईल, अशी आशा आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे.कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं कारण समोर आलं…

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    निवडणूक आयोगातील मतभेद आणि SIR च्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच. आता ठाकरे बंधुंनी देखील मोठं पाऊलं उचललं आहे. याविरोधात आता ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकञ येणार आहेत. पुन्हा…

    Leave a Reply

    You Missed

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार

    अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना