ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर घटना घडली आहे. त्याच्या कार्यालयात घुसून गोळीबार आणि धारदार शस्त्रानेही हल्ला केल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची हत्या

मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री गणेशनगर येथील कार्यालयाजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर इथेच थांबले नाहीत तर, गोळीबार केल्यानंतर त्यांच्या धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, त्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पण या घटनेनंतर ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रदीप पूर्णेकर हे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे बंधू आणि मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे ठाकरे गटाचे विभागप्रमुख होते.

हल्लेखोरांचा शोध सुरू

हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपाण्यासह इतर बाजूंनीदेखील तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहऱ्यावर रुमाल बांधलेले दोन जण दुचाकीवरून परिसरात जाताना दिसत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. क्राईम ब्रँचसह पोलिसांची पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत. पण प्रदीप पूर्णेकर यांच्यावरील हल्ल्याचे नेमके कारण, त्या मागचा सुत्रधार कोण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हत्या कट रचून करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप

दुसरीकडे प्रदीप पूर्णेकर यांची हत्या कट रचून करण्यात आल्याचा आरोर त्यांच्य कुटुंबीयांनी केला आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी धमकी दिल्याचा आरोप केला. राजेंद्र शिंदे यांनी बैठक घेऊन हा प्रकार घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

पूर्णेकर यांचे मोठे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही हल्ल्यापूर्वी रेकी केली जात असल्याचा दावा केला आहे. गणपती उत्सवापासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

हल्ल्याचं नेमकं कारण काय?

प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामागे नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून या हत्येमागील कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यातील स्थानिक राजकीय वातावरणातही मोठी खळबळ उडाली आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलीस या घटनेचा तपास करून खरं कारण नक्कीच समोर आणतील.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    पुण्यातील ऐतिहासिक नूतन मराठी विद्यालय (नूमवी) प्रशालेच्या परिसरात आगामी ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पाकिस्तानचे झेंडे लावून कराची शहराचा सेट उभारल्याने तीव्र वाद निर्माण झाला आहे. शाळेचे संस्थापक विष्णुशास्त्री…

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावर एक मोठा अपघात झाला असून,या अपघातात एक लग्जरी बस थेट उलटली आहे. यात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावर आज पहाटे एक मोठा…

    Leave a Reply

    You Missed

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार!  ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

    सतेज पाटलांना दणका! ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील, १५ दिवसांनंतर फुटली कोंडी

    सतेज पाटलांना दणका! ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील, १५ दिवसांनंतर फुटली कोंडी

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू