पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंधेरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाच्या सुरक्षेवरून आणि देखभालीवरून आधीच विविध प्राधिकरणांमध्ये वाद सुरू असताना, अंधेरी उड्डाणपुलाच्या देखभालीचं काम नेमकं कोण करणार ह्यावर अजूनही उत्तर सापडलेलं नसतानाच आता उड्डाणपुलाच्या दुरुस्ती खर्चात ३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजे ४० टक्क्यांहून अधिक मोठी वाढ झाली आहे. हा अतिरिक्त खर्चाचा भार नक्की कोणावर असणार आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई पालिकेवर म्हणजे पर्यायाने मुंबईकरांच्याच खिशातून जाणार
अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर, भार मुंबईकरांवर
अंधेरी उड्डाणपुलाच्या देखभालीचं काम नेमकं कोण करणार ह्यावर अजूनही उत्तर सापडलेलं नसतानाच आता उड्डाणपुलाच्या दुरुस्ती खर्चात ३८ कोटी रुपयांची वाढ झाल्याने हा अतिरिक्त खर्चाचा भार मुंबई पालिकेवर म्हणजे अर्थातच पर्यायाने मुंबईकरांच्याच खिशातून जाणार आहे.
क्चरल ऑडिटनुसार वाढीव दुरुस्ती सुचवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी उड्डाणपुलाच्या खर्चात 10 कोटी 87 लाखांची वाढ झाली आहे. खांब आणि बीमच्या मजबुतीच्या कामामुळे हा खर्च वाढला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचा एपूण खर्च 105 कोटी 53 लाखांवर गेला आहे. ‘व्हीजेटीआय’ आणि ‘आयआयटी मुंबई’कडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार वाढीव दुरुस्ती सुचवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंधेरी उड्डाणपुलाच्या संरचनात्मक मजबुतीकरण व दुरुस्तीचे मूळ कंत्राट 92 कोटी 67 लाख 34 हजार 887 रुपये इतके होते. मे. द. फ्रेस्सिनेट प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट कंपनीला 15 ऑक्टोबर 2024 रोजी पुलाच्या दुरुस्तीसाठी कार्यादेश देण्यात आला होता.
खर्चात वाढ का झाली?
१. मूळ कंत्राट आणि वाढलेला खर्च: अंधेरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी मुंबई पालिकेने सुरुवातीला सुमारे ९२.६७ कोटी रुपयांचे कंत्राट निश्चित केले होते. मात्र, व्हीजेटीआय (VJTI) आणि इतर तज्ज्ञ संस्थांकडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पुलाला अतिरिक्त मजबुतीकरणाची (Structural Strengthening) गरज असल्याचे समोर आले.
२. नवीन खर्च १२९ ते १३० कोटींवर: नवीन तांत्रिक शिफारशी आणि अतिरिक्त कामांमुळे या दुरुस्ती प्रकल्पाचा एकूण खर्च आता थेट १३०.३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
३. मुदतवाढ: खर्चात वाढ होण्यासोबतच या दुरुस्ती कामाची मुदतही वाढवण्यात आली असून, हे काम नोव्हेंबर २०२६ पर्यंत लांबण्याची शक्यता आहे
वाद देखभालीचा आणि फटका मुंबईकरांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलांची मूळ मालकी, हस्तांतरण आणि नियमित देखभालीची जबाबदारी एमएसआरडीसी (MSRDC) की पालिका (BMC) यावर अनेकदा तांत्रिक मतभेद समोर आले आहेत.
अपूर्ण समन्वय: पुलाच्या स्लॅबचे किंवा प्लास्टरचे भाग कोसळण्याच्या दुर्घटनांनंतर प्राधिकरणांनी तातडीने ऑडिटचे आदेश दिले. परंतु वेळेत योग्य देखभाल न झाल्याने पुलाची दुरवस्था झाली आणि आता थेट मोठ्या दुरुस्तीचा घाट घालावा लागला आहे.
कराचा पैसा उधळला?: प्रशासकीय दिरंगाई आणि नियोजनाच्या अभावामुळे कंत्राटाची रक्कम ९२ कोटींवरून १३० कोटींवर गेली. महापालिकेला या वाढीव खर्चासाठी स्थायी समितीची/प्रशासकाची मंजुरी घ्यावी लागणार असून, हा अतिरिक्त ३८ कोटींचा निधी पालिकेच्या तिजोरीतून दिला जाणार आहे.
वाहतूक कोंडी आणि मुंबईकरांचे हाल
खर्च वाढल्यामुळे एकीकडे सार्वजनिक पैशांची उधळपट्टी होत आहे, तर दुसरीकडे अंधेरी उड्डाणपुलावर सुरू असणाऱ्या संथ कारभारामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तासनतास वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. नोव्हेंबर २०२६ पर्यंत काम खेचले गेल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आणखी काही महिने वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
नागरिकांची मागणी
सरकारी यंत्रणांनी एकमेकांवर बोटे दाखवणे बंद करून उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा उत्तम राखावा, वाढीव खर्चाचे पारदर्शक लेखापरीक्षण (Audit) व्हावे आणि काम वेळेत पूर्ण करून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.








