ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर घटना घडली आहे. त्याच्या कार्यालयात घुसून गोळीबार आणि धारदार शस्त्रानेही हल्ला केल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची हत्या

मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री गणेशनगर येथील कार्यालयाजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर इथेच थांबले नाहीत तर, गोळीबार केल्यानंतर त्यांच्या धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, त्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पण या घटनेनंतर ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रदीप पूर्णेकर हे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे बंधू आणि मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे ठाकरे गटाचे विभागप्रमुख होते.

हल्लेखोरांचा शोध सुरू

हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपाण्यासह इतर बाजूंनीदेखील तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहऱ्यावर रुमाल बांधलेले दोन जण दुचाकीवरून परिसरात जाताना दिसत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. क्राईम ब्रँचसह पोलिसांची पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत. पण प्रदीप पूर्णेकर यांच्यावरील हल्ल्याचे नेमके कारण, त्या मागचा सुत्रधार कोण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हत्या कट रचून करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप

दुसरीकडे प्रदीप पूर्णेकर यांची हत्या कट रचून करण्यात आल्याचा आरोर त्यांच्य कुटुंबीयांनी केला आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी धमकी दिल्याचा आरोप केला. राजेंद्र शिंदे यांनी बैठक घेऊन हा प्रकार घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

पूर्णेकर यांचे मोठे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही हल्ल्यापूर्वी रेकी केली जात असल्याचा दावा केला आहे. गणपती उत्सवापासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

हल्ल्याचं नेमकं कारण काय?

प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामागे नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून या हत्येमागील कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यातील स्थानिक राजकीय वातावरणातही मोठी खळबळ उडाली आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलीस या घटनेचा तपास करून खरं कारण नक्कीच समोर आणतील.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंधेरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाच्या सुरक्षेवरून आणि देखभालीवरून आधीच विविध प्राधिकरणांमध्ये वाद सुरू असताना, अंधेरी उड्डाणपुलाच्या देखभालीचं काम…

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्क्रिनवर थेट आकडेवारी जाहीर करत. अतिवृष्टी…

    Leave a Reply

    You Missed

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

    २९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”