महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासूनच महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. राज्यात पावसाची उघडीप मिळताच उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून, अनेक भागांत तापमानात वाढ झाली आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून दुपारच्या वेळी उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत असल्याचा अनुभव येत आहे.

आता ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनही काही ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. सप्टेंबरअखेर राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीसमोरही आव्हाने वाढली असून, आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.ज्याला’ऑक्टोबर हिट’ असही म्हणतात.

‘ऑक्टोबर हिट’मुळे मुंबईकर हैराण

मुंबईतही उन्हाळ्यासारखं तापमान होत असल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईतील वाढत्या तापमान आणि आर्द्रतेमुळे नागरिकांना उन्हाळ्यासारखा त्रास आणि प्रचंड उकाडा जाणवत आहे.मुंबई आणि उपनगरांमध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.पण वातावरणातील गर्मी माञ कायम जाणवतेय.

कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता

2 ऑक्टोबर रोजी कोकणातील काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता आहे. मात्र, संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सध्या दिसत नाही. त्यामुळे काही भाग वगळता हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे

उत्तर महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे वातावरण

उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत अंशतः ढगाळ, मात्र प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. पावसाची तूट कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आगामी काही दिवसांतही पावसाची उघडीप कायम राहिल्यास शेतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात तुरळक सरी

अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, सध्या मोठ्या पावसाचा इशारा नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसा तापमान वाढल्याने ‘ऑक्टोबर हिट’ चा अनुभव अधिक तीव्र होऊ शकतो.

मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाने उघडीप घेतली आहे. सध्या या भागासाठी मोठ्या पावसाचा इशारा नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, मात्र उष्णता आणि दमटपणा जाणवण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्यास शेतीसह नागरिकांनाही उकाड्याचा त्रास होऊ शकतो.

विदर्भातही पावसाचा जोर कमी अन् उष्ण हवामान

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या भागांतही सध्या मोठ्या पावसाचा इशारा नाही. त्यामुळे पुढील काही दिवस उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.

परतीचा मान्सून ठरणार महत्त्वाचा

2 ऑक्टोबरला कोकण आणि घाटमाथ्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता असली तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी राहण्याचे संकेत आहेत. सप्टेंबरअखेरची पावसाची तूट आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून वाढणारी उष्णता यामुळे शेती आणि नागरिकांसमोर वेगळी आव्हाने निर्माण झाली आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी cjp चे मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नव्हती. तेव्हा अशा परिस्थितीत, सीजेपीने शिवाजी पार्कच्या बाहेर…

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आज २ ऑक्टोबर २०२६ गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन आयोजित करण्यात…

    Leave a Reply

    You Missed

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल