MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

भारतीय नौसेनेकडून अरबी समुद्रातील दोन महत्त्वाच्या ऑफशोअर डिफेन्स एरियामध्ये (ODA) मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार MH/BASSEIN आणि NEELAM या समुद्रातील क्षेत्रांना “नो फिशिंग झोन” म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभागाकडून अधिकृत शासन निर्णय दिनांक 03/04/2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रांमध्ये कोणतीही मासेमारी, बोटींची हालचाल किंवा इतर अनधिकृत कृती पूर्णतः बंद करण्यात आली आहे. भारतीय नौसेनेच्या सूचनेनुसार या क्षेत्रात नौदलाचे प्रशिक्षण, सुरक्षा आणि सामरिक ऑपरेशन्स होत असल्याने, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यावश्यक होता.

प्रतिबंधित क्षेत्रांचे निर्देशांक:

1. MH/BASSEIN ODA

18°31′45″N, 072°09′40″E

18°32′04″N, 071°09′08″E

19°46′49″N, 072°11′27″E

19°46′42″N, 072°11′36″E

2. NEELAM ODA

18°49′11″N, 072°10′00″E

18°49′03″N, 072°25′13″E

18°09′59″N, 072°25′13″E

18°10′00″N, 072°10′00″E

—

शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे:

1. ODA क्षेत्रामध्ये कोणतीही मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे. मासेमारी केल्यास नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित मच्छीमार, ट्रॉलर चालकांवर असेल.

2. मासेमारीदरम्यान बोटींमधून एखाद्या पाकिस्तानी मरीन सिक्युरिटी यंत्रणेकडून वापरली जाणारी यंत्रणा मिळाल्यास त्याची तातडीने माहिती द्यावी.

3. मच्छीमार बंधूंनी सागरी सुरक्षेबाबत अधिक दक्षता बाळगावी. मासेमारीसाठी बोटी पाठवताना योग्य ती माहिती मत्स्यव्यवसाय विभागात नोंदवावी.

—

सूचना:

या निर्णयाची माहिती सर्व मच्छीमार संघटना, सहकारी संस्था, ट्रॉलर मालक, नौका मालक, आणि स्थानिक पोलिस यंत्रणांना देण्यात आली असून, आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासन निर्णयावर आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य किशोर तावडे यांच्या स्वाक्षरीने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची आता धोक्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मध्यावधी निवडणुका त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये…

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    सध्या देशभरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आहे. बाप्पासाठी घरांपासून ते मंडळांपर्यंत सर्वांनीच जय्यत तयारी केली आहे. अगदी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. सुरुवात होती ती बाप्पाची…

    Leave a Reply

    You Missed

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका