अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार

आज २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडत आहेत. विसर्जन मिरवणुका आणि गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी राहण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रोकडून अशा वेळी मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो लाईन-3 म्हणजेच Aqua Line ची सेवा अनंत चतुर्दशीला रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशभक्तांसाठी मोठी सुविधा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केलं जाणार आहे. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शहरातील प्रमुख मार्गांवरून जातात. रात्री उशिरापर्यंत मुंबईत सर्वञ गर्दी पाहायला मिळते. गिरगाव चौपाटीसह मुंबईतील विविध विसर्जन स्थळांवर मोठ्या संख्येने गणेशभक्त दाखल होतात.

अनेक मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात, तर काही ठिकाणी विसर्जन पहाटेपर्यंत सुरू असतं. अशा परिस्थितीत विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना रात्री घरी परतताना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो-3ची सेवा रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबई मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार

मुंबई मेट्रो लाईन-3 म्हणजे Aqua Line च्या विशेष रात्रीच्या सेवेमुळे विसर्जन सोहळ्यात रात्री उशिरापर्यंत सहभागी होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण मुंबई तसेच मेट्रो-3 मार्गावरील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना या विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे.विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी किंवा त्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या गणेशभक्तांना सोहळा संपल्यानंतर घरी परतताना या मेट्रो सेवेचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.

रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील रस्त्यांवर मोठी गर्दी होते. विसर्जन मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक निर्बंध लागू केले जातात. काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच आज अनेक रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळणार त्यामुळे ही सोय करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रात्रभर मेट्रो सेवा उपलब्ध राहिल्याने नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडता येणार आहे.

त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासही मदत होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या विसर्जन मिरवणुका आणि बाप्पाच्या निरोप सोहळ्यानंतर घरी परतणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

प्रवाशांनी ‘या’ गोष्टी तपासणे महत्त्वाचे

मेट्रोची विशेष सेवा उपलब्ध असली तरी प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी तपासणे आवश्यक आहे. मेट्रोच्या विशेष सेवेची नेमकी वेळ, गाड्यांची वारंवारता, संबंधित स्थानकांची उपलब्धता तसेच स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था याबाबतच्या अधिकृत सूचना प्रवाशांनी पाहाव्यात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गर्दी मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाचा निकाल सुरुच असून हा निकाल कधी लागणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. येत्या…

    मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    मालाड पश्चिम परिसरात आज १२ ऑक्टोबर रोजी दुपारी  सैफुल वैद्य वय ३५   बसच्या खाली म्हणजे मागील चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी १:३० ते २:३० च्या दरम्यान…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    मालाड पश्चिमेत बस अपघात!  तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात, आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात,  आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका” CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका”  CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘या’ मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द,नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता

    रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘या’ मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द,नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण