विक्रमगड विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा; खाऊ अन् शालेय वस्तूंचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन

निसर्ग प्रेमी बहुउद्देशी संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हा पालघर मधील विक्रमगड तालुक्यामधील एकूण नऊ विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय वस्तू , खेळाचे साहित्य आणि खाऊ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.दिनांक १७ जुलै २०२६ रोजी शुक्रवार रोजी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या उपक्रमाचा लाभ परिसरातील एकूण ३२३ गरजू विद्यार्थ्यांना मिळाला.

आदर्श विद्यार्थ्यांचा गौरव अन् पद्मश्री भिकल्या धिंडा बाबांची भेट

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा साखरे-गावठाण, साखरे-पाटील पाडा आणि साखरे डोंगरी पाडा या शाळांना भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच प्रत्येक शाळेतील एका ‘आदर्श विद्यार्थ्याला’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या प्रवासादरम्यान आदिवासी लोककलेचे जतन करणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदरणीय भिकल्या धिंडा बाबा यांची अविस्मरणीय भेट झाली. संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशीचे औचित्य अन् कार्यक्रमस्थळी गोल रिंगण

तसेच कार्यक्रम संपल्यावर आगामी आषाढी एकादशीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थी व संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत वारकरी रूपात गोल रिंगण तयार करून सुंदर असे विठ्ठलाचे गाणे गाऊन नृत्य सादरीकरण केले. ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

९ शाळांमध्ये साहित्याचे वाटप

यानंतर पुढील सत्रांमध्ये जिल्हा परिषद शाळा तीवस पाडा, खुडेद-घोडीचा पाडा, खुडेद-म्हसेपाडा, खुडेद-महाल पाडा तसेच चौथ्या सत्रात जिल्हा परिषद शाळा खुडेद-कुंडाचा पाडा आणि खुडेद-झाप पाडा येथे भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विक्रमगड येथील संतोष पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी विद्यार्थ्यांना विशेष खाऊ वाटपही करण्यात आला.

सहकार्य करणाऱ्यांचे आभार

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई, पालघर, वसई आणि डहाणू येथील संस्थेचे सर्व कमिटी सदस्य, पदाधिकारी, संघटक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात पाऊस जास्त असल्याने विक्रमगड येथील रहिवासी ईश्वर बाळू पवार व भीमा ईश्वर पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्नेहभोजनासाठी आपले घर उपलब्ध करून दिले. तसेच अर्जुन सुरुम सर, मोहन शिरकर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य केले.या सर्वांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या उपक्रमाला ‘समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘पोलिस मित्र सक्षमीकरण संस्था’ यांचेही मोलाचे सहकार्य लाभलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक विश्वप्रार्थना, घोषणा आणि पसायदानाने या कौतुकास्पद उपक्रमाची सांगता करण्यात आली.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून, चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे…

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

संवेदनशील महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतं. एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या ४ दिवसांत तब्बल १० कोटी रुपये गोळा करून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा माणुसकीचं एक अनोखं…

Leave a Reply

You Missed

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल