डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

डोंबिवलीतील वाहतुकीबद्दल नेहमीच नागरिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. वाहतूककोंडीची समस्या तर नित्याचीच झाली आहे. सोबतच भरधाव वेगात चालणारी रिक्षा असो, कार असो किंवा बाईक. रस्त्यावर वेग मात्र सारखाच असतो. यामुळे एक भयानक अपघात घडला.पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली

भरधाव कारचा थरार

डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली.या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली आहे. मात्र दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला.

सर्रास विरुद्ध दिशेने वाहन चालवतात

डोंबिवली-कल्याण शिळ मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.या वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवतात.अशाच प्रकारातून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत संतापले

या मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीसह ‘राँग साईड’ने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी म्हटलंय की, “दररोज वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक नागरिक आणि विद्यार्थी त्रास सहन करतात त्यामध्ये काही मुजोर वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहना घेऊन प्रवास करतात.त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. आज जी घटना घडली यामध्ये वाहनांच्या नुकसान तर झालच आहे.परंतु,पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. वाहतूक कोंडी कशी कमी होणार, याकडे पोलीस प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली पाहिजे. कठोर कारवाई केली पाहिजे”.असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या अपघातानंतर तरी वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वेगमर्यादेबद्दल आणि विरुद्ध दिशेनं वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेपासून ते काम करण्यास दिरंगाई करण्यापर्यंत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत.पण जेव्हा प्रशासनाचा दणका बसतो तेव्हा अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. लातूर येथील जिल्हा परिषदेत कर्मचारी…

मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

राज्यातील अनेक गावात आजही स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांनी नेहमीच फरफट होते. म्हणजे माणूस गेल्याचं दु:खापेक्षा मरणानंतरही त्याला कष्ट पडावे या विचारानेच ग्रामस्थांचा संताप होतो. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी किंवा शेड…

Leave a Reply

You Missed

डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित