काँग्रेसचे एक निष्ठावान,अभ्यासू आणि कार्यतत्पर कार्यकर्ते अशी ओळख असणारे अॅड. विक्रम कपूर यांची उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. कोणतीही भक्कम राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना, केवळ स्वतःचे कष्ट, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि तळागाळातील लोकांशी जपलेली बांधिलकी यांच्या बळावर त्यांनी हा टप्पा गाठला आहे.
माजी मंत्री तथा आमदार असलम शेख यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे सहकारी म्हणून अॅड. विक्रम कपूर ओळखले जातात.पण त्यांनी त्यांच्या कार्यातून आता एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांनी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळताना नेहमीच अभ्यासूवृत्ती दाखवली आहे.
पक्षसंघटनेसाठी ग्राउंड लेव्हलवरून योगदान
अॅड विक्रम कपूर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून केली.पण तळागाळातील कामे,वॉर्ड स्तरावर अध्यक्षांपासून ते लोकप्रतिनिधींचे सहकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
एवढंच नाही तर पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास परिश्रम घेतले. काँग्रेस पक्षाचे विचार, धोरणे आणि कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
अॅड विक्रम कपूर यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये काय आहेत?
संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा
संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा ही दोन मुख्य गुण त्यांच्या स्वभावात आहेत.अॅड. विक्रम कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि काम करण्याच्या पद्धतीमधील हे महत्त्वाचे नियम आहेत.
शांत आणि संयमी
सोबतच शांत आणि संयमी स्वभावाने ते कायम सर्वांची मने जिंकतात. कोणताही गाजावाजा किंवा स्टंटबाजी न करता शांतपणे काम करण्यावर त्यांचा विश्वास आहे.
सामाजिक बांधीलकी
वकील असल्यामुळे प्रशासकीय कामकाज, कायद्याच्या चौकटीतील प्रश्न आणि पालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यात त्यांची मोठी पकड आहे.कायदेशीर आणि प्रशासकीय कौशल्य देखील त्यांच्यात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना ती केवळ राजकीय जबाबदारी न मानता सामाजिक बांधीलकी म्हणून पार पाडतात.
नागरी प्रश्न आणि पाठपुरावा
मुंबईतील स्थानिक नागरिकांशी सातत्याने थेट संपर्क ठेवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेणे, रस्त्यांचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून समस्या तडीस नेणे ही त्यांची काम करण्याची प्रमुख पद्धत आहे.
पक्षाकडून कार्याची दखल
काँग्रेस पक्षाने त्यांच्या प्रदीर्घ सेवा आणि निष्ठावंत कार्याची दखल घेत त्यांच्यावर उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नवीन जबाबदारीमुळे उत्तर मुंबईत काँग्रेस पक्षाची बांधणी आणखी मजबूत होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, वॉर्ड स्तरावरील कार्यकर्ते, समर्थक आणि उत्तर मुंबईतील स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








