काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

एकीकडे देश डिजिटल आणि हायटेक होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील एका गर्भवती महिलेला 2 किमी खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागणे हे नक्कीच लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. भाटू तांड्यासारख्या अनेक दुर्गम भागात तात्काळ पक्क्या रस्ते बांधण्यात यावे यासाठी कित्येक वर्षांपासून नागरिकांची मागणी आहे.मात्र अद्यापही याबबात कोणतीही दखल घेतली गेली नाही.

गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात मूळ भूत सुविधांची दाणादाण उडालेली पाहायला मिळते. रस्ता, पाणी आणि आरोग्य या मूलभूत गरजांसाठी ग्रामीण भागातील जनतेला दररोज संघर्ष करावा लागतो. पक्क्या रस्त्यांअभावी आणि दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे दुर्गम व आदिवासी भागातील गर्भवती महिलांना खाट, स्ट्रेचर किंवा झोळीवरून मैलोनन्‌मैल प्रवास करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागल्याच्या घटना वारંवार समोर येत आहेत. प्रशासकीय आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत

अशीच एक घटना घडली नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील भाटू तांडा येथे. पक्का रस्ता नसल्यामुळे आणि पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने एका प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेला चक्क खाटेवरून २ किलोमीटरचा चिखलमय रस्ता तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले.

नेमकी घटना काय?

भाटू तांडा येथील रहिवासी अनिल राठोड यांची कन्या ‘वर्षा’ या आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. गुरुवारी अचानक त्यांना तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाटू तांड्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता.

रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने गावात कोणतीही चारचाकी गाडी किंवा ॲम्बुलन्स पोहोचणे अशक्य झाले. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यास आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता.

लाकडी खाटावरून नेलं रुग्णालयात

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मदतीला धावून आले. त्यांनी घरात असलेली लाकडी खाट बाहेर काढली आणि त्यावर वर्षा यांना झोपवून २ किलोमीटरचा चिखलाचा टप्पा पार करण्यास सुरुवात केली. मुसळधार पाऊस आणि निसरड्या रस्त्यावरून वाट काढत, पायी चालत ग्रामस्थांनी तिला मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवलं आहे.

मुख्य रस्त्यावर आल्यानंतर तेथून खाजगी वाहनाने त्यांना तत्काळ मुखेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वेळेत रुग्णालय गाठल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. वेळेत रुग्णालय गाठल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वर्षा यांनी रुग्णालयात एका कन्येला जन्म दिला. सध्या बाळ आणि आई दोघींचीही प्रकृती उत्तम आणि सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या आनंदाच्या बातमीने राठोड कुटुंब आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या घटनेमध्ये बाळ आणि आई दोघींचीही प्रकृती उत्तम आणि सुखरूप असली तरी प्रशासनाच्या या उदासीनतेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा कधी संपणार? भाटू तांड्यात आजपर्यंत पक्का रस्ता का बनू शकला नाही? पावसाळ्यात ही गावे मुख्य प्रवाहापासून तुटतात, मग प्रशासन याची गंभीर दखल कधी घेतली जाणार आहेत. असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनचा यशस्वी दौरा आटोपून मुंबईत परतले. माञ आता त्या प्रवासातील एका प्रसंगाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. तो प्रसंग म्हणजे मुंबईला येताना ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच एकनाथ…

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    Leave a Reply

    You Missed

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?