शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर कुणाचा अधिकार हा निकाल अद्याप प्रलंबित आहे.आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे.सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल हे उद्धव सेनेची बाजू मांडत आहेत. आज सुनावणी असल्याने राजकीय पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल. चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत केलं होतं. यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

अडीच-तीन वर्षांपासून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन गटात विभागलेली आहे. अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे सोपवलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं.  मागच्या अडीच-तीन वर्षांपासून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

आमदार म्हणजे पक्ष नव्हे…

आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत बघितलं, पण त्याचवेळी पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केले. विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवून चूक केली असे बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली.

चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रात सरकार बनवलं. आज शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन गटात विभागलेली आहे. अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे सोपवलं.

उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आव्हान

मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. मागच्या अडीच-तीन वर्षांपासून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर कुणाचा अधिकार हा निकाल अद्याप प्रलंबित आहे.आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष 

त्यामुळे आज शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठणार का हा महत्त्वाचा प्रश्न दोन्ही गटांसमोर आहे. आता हे प्रकरण निकालाच्या टप्प्यात पोहचले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सगळ्या देशाचे तसेच राजकीय पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचे या लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या दोन्ही गटात तुफान राडा झाला.…

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    भष्टाचार प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतोय. मग ती कोणती नोकरी असो किंवा कोणती परीक्षा. घोटाळेबाज सगळीकडेच असतात. पण नेहमी इतरांचे घोटाळे आणि गुन्हे उघडकीस आणणारेच घोटाळेबाज निघाले तर. होय, मुंबई पोलिस…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका