पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

आज मुंबई मंत्रालयात महाराष्ट्र राज्य पशुपालक संघटना आणि महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटना यांची पशुसंवर्धन विभाग आणि ऊर्जा विभागाचे सचिव यांच्यासोबत अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. ही बैठक संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या घेण्यात आली होती. विविध प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने अनिल खामकर, विलास साळवी, शरद गोडांबे, नंदू चौधरी आणि प्रकाश लसणे यांनी अत्यंत भक्कमपणे बाजू मांडली.

बैठकीत मांडण्यात आलेले महत्त्वाचे ५ मुद्दे कोणते ते पाहूयात  

नोंदणीकृत करारनामा

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पशुपालक शेतकरी आणि संबंधित कंपन्या यांच्यात नोंदणीकृत (रजिस्टर) करारनामा बंधनकारक करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.भारत सरकारच्या गाईडलाईननुसार पशुपालक आणि कंपनी यांच्यात रजिस्टर करारनामा बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली.

कर्नाटक आणि तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा

कर्नाटक सरकारने पशुखाद्याबाबत आणि तेलंगणा सरकारने नोंदणीकृत करारनाम्याबाबत शेतकरीहिताचे कायदे केले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच योग्य तो कायदा करण्यात येईल, असे आश्वासन सचिवांकडून देण्यात आले.सचिवांकडून देण्यात आले.

कायद्याच्या निर्मितीत दिरंगाई नको

हा कायदा तयार करताना कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा किंवा प्रशासकीय दिरंगाई होऊ नये, अशी ठाम भूमिका संघटनांच्या वतीने मांडण्यात आली आहे.

कृषी समकक्ष दर्जा कायद्याची तात्काळ अंमलबजावणी

महाराष्ट्र शासनाने पशुपालन आणि कुक्कुटपालनाला दिलेल्या कृषी समकक्ष दर्जाच्या कायद्याची  GR दिनांक 31 जुलै 2025, GR क्र. पविवआ-0325/प्र.क्र.74/पदुम-3, संकेतांक 202507311157162901 ताबडतोब अंमलबजावणी करावी, असा विषय मांडण्यात आला. या GR अंतर्गत मिळणारी कृषी दराने वीज, ग्रामपंचायत कर आणि व्याज सवलत तात्काळ लागू करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

विभागनिहाय स्वतंत्र प्रयोगशाळा

पशुखाद्याची गुणवत्ता जलद गतीने तपासण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक महसुली विभागात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात यावी.

मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन 

सचिवांनी संघटनांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरात लवकर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी खाद्यतेल विक्रीबाबत आपली कारवाई केली होती. खाद्यतेलातील भेसळ आणि गुणवत्तापूर्ण दर्जा कायम ठेवण्यासाठी त्यांनी सुटे खाद्यतेल विक्रीला…

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मनोरी-गोराई समुद्रकिनारी प्रस्तावित असलेल्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला आणि उभारणीला स्थानिक मच्छिमार, शेतकरी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बोरीवली येथील आर-मध्य…

    Leave a Reply

    You Missed

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…