राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोराई-मनोरी किनाऱ्याजवळ गेल्या चार महिन्यांपासून अडकलेल्या एका मोठ्या जहाजावर धक्कादायक घटना घडली आहे. या जहाजातून तब्बल चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

शिपवर चोरी करण्याचा प्रयत्न अन्…..

मुंबईच्या मनोरी येथे अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. माञ त्या चार चोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चोरांनी छोट्या बोटीच्या सहाय्याने मनोरी बीचवर मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपवर यापूर्वी अनेक वेळा चोरी केली होती. त्यानंतर पुन्हा सात जणांची टोळी चोरी करण्यासाठी बोटीने शिपवर पोहोचली होती. त्यापैकी तीन जण बाहेर होते आणि चार जण आतमध्ये गेले होते, त्याचवेळी आतमध्ये काहीतरी स्फोट झाला ज्यात चार चोरांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यातील एकाने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.तर काही सुञांच्या मते दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात आठ जणांची एक टोळी स्पीडबोटने जहाजाजवळ आली होती. त्यातील एक जण बोटीवरच थांबला, तर इतर सात जण जहाजावर चढले.

तिसरा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी

मात्र मनोरी समुद्रात मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपजवळ गोराई पोलिस, कोस्टगार्ड आणि नेव्हीची टीम दाखल झाली असून प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांच्या तपासानुसार, चोरांनी यापूर्वी दोनदा जहाजाला लक्ष्य केले होतं. त्यांनी २.५ लाख म्हणजे (२,५०,००० अमेरिकन डॉलर्स) आणि ५ लाख म्हणजे (५,००,००० अमेरिकन डॉलर्स) किमतीचा माल चोरला होता. हा त्यांचा तिसरा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी होता. या घटनेनंतर स्वतः चोरांपैकी एका सदस्याने ही माहिती पोलिसांना कळवली.

पोलीस जहाजातून मृतदेह बाहेर काढले

दरम्यान आता जहाजातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. माहिती मिळताच, गोराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नौदलाला कळवले. पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नौदलाच्या मदतीने, पोलीस जहाजातून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाची तयारी करत आहेत. घटनेचा क्रम, मृत्यूचे नेमके कारण आणि चोरीचा पैलू निश्चित करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

जहाज चार महिन्यांपासून मुंबईतील या समुद्रात अडकून पडले होते

शिपच्या आत नेमका कोणत्या कारणामुळे स्फोट झाला, याचा तपास केला जात आहे. तसेच शिपमध्ये गेलेल्या सात जणांपैकी चार जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचीही माहिती घेतली जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जहाज गेल्या चार महिन्यांपासून मुंबईतील या समुद्रात अडकून पडले आहे. हे जहाज गेल्या चार महिन्यांपासून मनोरीच्या किनाऱ्यावर अडकून आहे. याच्या मालकाविरुद्ध आधीच एफआयआर दाखल करण्यात आला असून, तो परदेशात फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या जहाजाचा वापर अवैध तेल-संबंधित कामांसाठी केला जात होता, असे म्हटले जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    तुम्हीेदेखील आज मुंबईत गाडी घेऊन प्रवेश करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहूना मुंबईकरांसाठी ही बातमी खर्चात आणि चिंतेत टाकणारी आहे.ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेपासून मुंबईकरांच्या खिशाला चांगलाच…

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंधेरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाच्या सुरक्षेवरून आणि देखभालीवरून आधीच विविध प्राधिकरणांमध्ये वाद सुरू असताना, अंधेरी उड्डाणपुलाच्या देखभालीचं काम…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी