मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

मेरठमधील प्रसिद्ध निळ्या ड्रम हत्याकांड प्रकरणामुळे सर्वांनाच हादरवलं होतं.पतीची हत्या करून पत्नीने त्याचा मृतदेह आपल्या प्रियकराच्या मदतीने निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता. या प्रकणाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात पत्नीला मृत्युदंडाची शिक्षा 

या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना जिल्हा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. पतीची हत्या करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवल्याच्या आरोपाखाली असलेल्या मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल यांना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

निर्णय संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरेल

न्यायालयाने त्या दोघांनाही गुन्हेगार ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. तसेच त्यांच्यावर ५०,००० आणि २०,००० रुपयांचा दंडही ठोठावला. महाभारतातील वचनांचा संदर्भ देत न्यायालयाने सांगितले की, गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देणे हा धर्म आहे. शिक्षा गुन्ह्याच्या प्रमाणात असावी. हा निर्णय संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरेल. अशा कृत्यांमध्ये वाढ होत होती. यामुळे त्यांना आळा बसेल. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तीव्रता पाहता, हा एक ऐतिहासिक निर्णय समजला जात आहे.

३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्या दोघांना दोषी ठरवलं

या खून प्रकरणात, न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल यांना दोषी ठरवले. जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल दिला. शिक्षेची तारीख १४ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. सौरभ राजपूत खून प्रकरणाची सुनावणी जुलै २०२५ मध्ये सुरू झाली. सुमारे १३ महिने चाललेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान, १२६ तारखांना २२ हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

सौरभचा मृतदेह त्याच्याच घरात एका निळ्या ड्रममध्ये सापडला होता

निळ्या ड्रममुळे सौरभ राजपूतची हत्या राष्ट्रीय चर्चेचा विषय बनली. सौरभचा मृतदेह त्याच्याच घरात एका निळ्या ड्रममध्ये सापडला होता. त्याची पत्नी, मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर, साहिल, यांच्यावर सौरभची हत्या करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये कोंबल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी १९ मार्च रोजी पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक करून तुरुंगात पाठवले.

मृत सौरभ राजपूतच्या कुटुंबीयांनी दोन्ही आरोपींना मृत्युदंड देण्याची न्यायालयाला विनंती केली होती. सौरभ राजपूतचा भाऊ राहुल म्हणाला, “आम्ही नेहमीच न्यायाची आशा बाळगली आहे. त्यांनी आमच्या भावाबरोबर जे केले, तीच शिक्षा त्यांना मिळावी अशी आमची नेहमीच मागणी राहिली आहे.”

ब्लू ड्रम हत्याकांडाची चर्चा देशभरात झाली

निळ्या ड्रममुळे सौरभ राजपूतची हत्या राष्ट्रीय चर्चेचा विषय बनली. सौरभचा मृतदेह त्याच्याच घरात एका निळ्या ड्रममध्ये सापडला होता. त्याची पत्नी, मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर, साहिल, यांच्यावर सौरभची हत्या करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये कोंबल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी १९ मार्च रोजी पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक करून तुरुंगात पाठवले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    आयआयटी मुंबई येथील अनुसूचित जातीतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संस्थात्मक हत्येच्या प्रकरणात दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आमदार असलम शेख, खासदार प्रा.वर्षाताई गायकवाड आणि आमदार…

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’ नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री झाली आहेत. सर्वांनाच याबाबत प्रश्न पडला असेल ना की हे काय नवीन. राजकारणात ही काय नवीन एन्ट्री होत आहेत. आधी कॉकरोज…

    Leave a Reply

    You Missed

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! दिवाळीच्या आधी साखरेचे भाव १७ टक्क्यांनी वाढले, किंमत ऐकून धक्का बसेल

    ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! दिवाळीच्या आधी साखरेचे भाव १७ टक्क्यांनी वाढले, किंमत ऐकून धक्का बसेल

    मढच्या रहेजा ओशन एक्सोटिका बांधकामाला BMC कडून ‘स्टॉप वर्क नोटीस’; आमदार असलम शेख यांच्या हस्तक्षेपानंतर मोठी कारवाई!

    मढच्या रहेजा ओशन एक्सोटिका बांधकामाला BMC कडून ‘स्टॉप वर्क नोटीस’; आमदार असलम शेख यांच्या हस्तक्षेपानंतर मोठी कारवाई!

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश