अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी

अंबड तालुक्यातील एका घरात भरदिवसा घडलेली घरफोडीची घटना आज परिसरात खळबळ उडवणारी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, देवळगाव राजा तालुक्यातील रहिवासी 63 वर्षीय व्यक्ती आपल्या मुलाकडे अंबड येथे आले होते. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या गावी देवळगाव येथून फोन आला की, त्यांच्या गावी असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे.

घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ देवळगावला प्रयाण केले. गावातील शेजाऱ्यांनी सांगितले की, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यावेळी शेजाऱ्यांनी आवाज ऐकून त्या ठिकाणी लक्ष दिले असता चोरटे घाबरून पळाले.

मात्र पळताना त्यांनी काही साहित्य चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील दरवाजे, खिडक्यांचे कुलुपे तोडलेले असून घरात सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसले. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे.

सदर घटनेबाबत अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांची माहिती यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक धरणे फुल्ल भरले असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांना दिलासा मिळत…

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    तब्बल ₹४० कोटींच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज तस्करी आणि नेटवर्कशी संबंधित हाय-प्रोफाईल प्रकरणात मुख्य आरोपीला न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब खान याचा जामीन…

    Leave a Reply

    You Missed

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई