संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात;
ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

ठाणे,दि.१५ एप्रिल
देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेले ‘संघटन सृजन अभियान’ ठाणे शहरात सुरू झाले आहे.
‘संघटन सृजन अभियान’ या अभियानाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद, यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस, संघटन सृजन कोकण प्रभारी गुरुबिंदरसिंग बच्चर ही मंडळी ठाणे दौऱ्यावर आले आहेत. या पथकाने बुधवारी ठाणे कांग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदीसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी, कशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबविण्यात येईल याबाबत विस्तृत माहिती दिली. जावेद यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने वर्ष 2025- 2026 संघटनेसाठी समर्पित केले असून अखिल भारतील स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय पथक ठाण्यात आले असून पुढील चार पाच दिवस प्रत्येक मतदारसंघात व ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्थरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. या माध्यमातून आगामी काळात संघर्ष करणारे नेतृत्व निवडले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
तर आमदार अतुल वंजारी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सर्व राज्यभर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहेत. प्रदेश व शहर पदाधिकारी, विविध सेल, ब्लॉक व ब्लॉकस्तरीय सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक स्वरूपात संवाद साधून मते जाणून घेण्यात येतील. नवीन जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी कशा पद्धतीचे असले पाहिजे, याची निवड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.या गुरुवारपासून पुढील चार दिवस वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्याशी केंद्रीय निरीक्षक वैयक्तिक संवाद साधून 20 ते 21 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल पाठविला जाईल.त्यानंतर 10 मे पर्यंत जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या जातील. असेही आ. वंजारी यांनी स्पष्ट केले.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या खात्यात लवकरच १,५०० चा हप्ता जमा होण्याची…

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा.…

Leave a Reply

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा