तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

तमिळनाडूच्या राजकारणात अखेर मोठा पेच संपुष्टात आला असून, ‘तमिळगा वेत्री कळघम’ म्हणजेच TVK पक्षाचे प्रमुख विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.
गुरुवारी ७ मे रोजी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची पुन्हा एकदा भेट घेत सरकार स्थापनेचा औपचारिक दावा सादर केला. या भेटीत विजय यांनी आपल्या सरकारला मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत सविस्तर माहिती राज्यपालांना दिल्याचे समोर आले आहे.
शपथविधीनंतर विधानसभेत आपण सहज बहुमत सिद्ध करू, असा ठाम विश्वास विजय यांनी राज्यपालांसमोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, सरकार स्थिर राहील आणि बहुमताबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असेही विजय यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विजय यांनी आपल्या समर्थनार्थ उभ्या असलेल्या पक्षांची आणि आमदारांची आकडेवारी राज्यपालांसमोर मांडली. त्यानंतर राज्यपाल आर्लेकर यांनी समाधान व्यक्त करत विजय यांना सरकार स्थापनेसाठी औपचारिकपणे निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे.
तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली TVK पक्षाने मोठी राजकीय ताकद निर्माण केल्यानंतर आता सत्तेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.
दरम्यान, विजय यांच्या शपथविधीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तमिळनाडूत नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होणार का, याची उत्सुकता वाढली आहे
Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सहाव्या दिवशी अभिनेता विजय यांच्या टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षासाठी सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.…

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू ठाणे,दि.१५ एप्रिल देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात…

Leave a Reply

You Missed

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!