तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सहाव्या दिवशी अभिनेता विजय यांच्या टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षासाठी सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.

तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व्हीसीके अर्थात विदुथलाई चिरुथैगल काची पक्षाने अखेर विजय यांच्या टीव्हीकेला अधिकृत पाठिंबा दिला आहे. व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी टीव्हीके नेते अधव अर्जुन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. या भेटीचा फोटोही आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हीसीकेच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यापूर्वी टीव्हीकेकडे 116 आमदारांचा पाठिंबा होता. आता हा आकडा वाढून 119 वर पोहोचला असून, 234 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा एकने अधिक झाला आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील सत्तासमीकरणांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना हैदराबादला हलवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेलूरचे आमदार पी. विश्वनाथन हे या आमदार गटाचे नेतृत्व करत आहेत. तसेच, विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास पी. विश्वनाथन यांना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकीत टीव्हीकेने 108 जागांवर विजय मिळवला. याशिवाय काँग्रेसचे 5, सीपीआयचे 2 आणि सीपीआय(एम)चे 2 आमदार आधीच विजय यांच्या बाजूने उभे राहिले होते. आता व्हीसीकेच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्या सरकार स्थापनेचा दावा आणखी मजबूत झाला आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते मुख्यमंत्री असा विजय यांचा प्रवास आता प्रत्यक्षात उतरणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं…

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच अमित शहा हे मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या…

    Leave a Reply

    You Missed

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल