मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

प्रवाशांच्या समस्यांवर मनसेची भूमिका आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. स्थानकावर छताची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता, तिकीट घरांतील गैरसोयी तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालाड पश्चिम व कांदिवली विधानसभा यांच्या वतीने मालाड रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर श्री. संतोष परब यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रवाशांच्या विविध मागण्यांचे आणि समस्यांचे सविस्तर निवेदन त्यांना देण्यात आले.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानक परिसरातील व प्लॅटफॉर्मवरील गैरसोयी दूर करून प्रवाशांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच रेल्वे प्रशासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

“प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मालाड रेल्वे स्थानकावरील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल,” असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी आंदोलकांबाबात सुप्रीम कोर्टाकडून चांगलाच झटका मिळाला आहे.वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, दिल्लीतील जंतर-मंतर किंवा कोणत्याही राज्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस सध्या कोणतीही कारवाई…

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी येत्या ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे.राज्याच्या…

    Leave a Reply

    You Missed

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!