कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेपासून ते काम करण्यास दिरंगाई करण्यापर्यंत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत.पण जेव्हा प्रशासनाचा दणका बसतो तेव्हा अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. लातूर येथील जिल्हा परिषदेत कर्मचारी नियमितपणे वेळेवर उपस्थित राहत असल्याचे दाखवत ऑनलाईन हजेरी लावून थेट गायब होत असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे पदाधिकारी व प्रशासनाने बुधवारी सकाळी १०.१५ वाजता खरी परिस्थिती पाहण्यासाठी थेट धाड टाकली. या अचानकच्या तपासणीदरम्यान, २० टक्के कर्मचारी आपल्या कार्यालयात उशिरा आल्याचे उघडकीस आले आहे. त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.

अचानक तपासणीमुळे कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा समोर

जिल्हा परिषदेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे म्हणून ‘आधार बेस अटेंडन्स सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. मात्र, काही कर्मचारी सकाळी ऑनलाईन हजेरी नोंदवतात अन् गायब होतात. ते आपल्या कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आलं. बुधवारी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी संयुक्तपणे प्रत्येक विभागांस अचानक भेटी देऊन पाहणी केली. यावेळी शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, पंचायत, अर्थ, आरोग्य, समाजकल्याण, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागांची पाहणी केली.

कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु

ऑनलाईन हजेरी लावून कामावर कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु असल्याचे समजतंय.या तपासणीत कर्मचाऱ्यांच्या हजेरीबरोबर कार्यालयीन स्वच्छतेचीही पाहणी करण्यात आली.

तपासणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

प्रशासनाच्या या अचानक केलेल्या तपासणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वेळेवर आपल्या कार्यालयात उपस्थित नसलेल्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले.

तीन दिवसांची मुदत दिली जाणार

जिल्हा परिषदेतील जवळपास २० टक्के कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना आता नोटिसा बजावण्यात येणार आहेत. खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

  • Related Posts

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. पडळकर यांनी 54 मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारावर २०…

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    पवार कुटुंबातून सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या…

    Leave a Reply

    You Missed

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

    दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

    मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने

    मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने

    महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!