कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावरून सुरू झालेली आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत धडकलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ सध्या देशातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. इन्स्टाग्रामवरून थेट रस्त्यावरील लढाईत उतरलेल्या या पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. 12 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना करणं जे जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं. देशाच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. एका अर्थाने या आंदोलनाने इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. पण या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. त्याबद्दल सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे.याबद्दल पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जो निर्णय आहे तो स्पष्टच सांगून टाकला आहे.

अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठक

याबबात अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठकही सुरु आहे. अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये रहायला आहेत. पार्टीची पुढच्या रणनिती काय असणार आहे हे ठरवण्यासाठी अभिजीत दीपकेनं ही बैठक बोलावली असल्याचं म्हटलं जातं.या बैठकीआधी त्याने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्याला विचारलं की, कॉकरोच जनता पार्टी निवडणूक रिंगणात उतरणार का? त्यावर त्याने सध्या काय ठरलय ते स्पष्टपणे सांगून टाकलं.

देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता…

“मला असं वाटतं की, प्रसारमाध्यमांना जास्त उत्सुक्ता लागली आहे की आम्ही राजकीय पक्ष बनवावा.या देशात जेवढे राजकीय पक्ष आहेत, मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून निराश आहात. आम्हाला ही सामाजिक चळवळच अशीच ठेवायची आहे. देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता अजून एक राजकीय पक्ष बनवून काय करणार?” असा सवाल अभिजीतने विचारला.

राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे

“लोकांचा राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे. सकाळी लोक एकाला मतदान करतात, संध्याकाळी सरकार दुसऱ्या पक्षाचं बनलेलं असतं. सकाळी एक आमदार नंतर खासदार बनतो, संध्याकाळी तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो” असं म्हणत अभिजीत दीपके पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांची संख्या सध्या वाढत चाललेली दिसत आहे. तसेच राजकीय पक्ष न बनता सामाजिक चळवळ म्हणून काम चालू ठेवण्याचा निर्धार असल्याचं अभिजीत दीपकेनं म्हटलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या खात्यात लवकरच १,५०० चा हप्ता जमा होण्याची…

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा