महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

मुंबई ते नाशिक महामार्गाची पावसाने अक्षरश: चाळण झाली असून या महामार्गावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे.याचचं एक जिवंत उदाहरण म्हणजे नुकताच शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत यहा खड्डा बुजवला होता. मात्र,बाकीच्या खड्ड्यांच काय असा प्रश्न निर्माण होत आहे. असे एकेक खड्डे बुजवण्याऐवजी मुंबई ते नाशिक महामार्गाची झालेली चाळण बुजवून प्रवाशांचे प्राण वाचवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

हे तेच विकास गोरे आहेत ज्या जवानाने पूरग्रस्त भागात बचावकार्यात स्वतःला झोकून देऊन अनेकांचे जीव वाचवले, नुकतंच भिवंडीत जी धोकादायक इमारत कोसळली त्या अपघातात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवलं. पण ठाणे पालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलातील जवान विकास लहू गोरे यांचा खड्ड्याने बळी घेतला.

खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक आदळून….

शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यात अपघात होऊन विकास गोरे यांचा मृत्यू झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी पहाटे कळंभे हद्दीत भारंगी नदीच्या पुलाजवळ मोठ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक आदळून त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. ते रस्त्यावर फेकले जाऊन डिव्हायडरवर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.स्थानिकांनी तत्काळ त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही.

गोरे हे ठाण्याला जाण्यासाठी पहाटे ४:३० वाजता आसनगावहून सुटणारी पहिली लोकल पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे बुलेटवरून निघाले होते.असे शहापूरचे पोलिस निरीक्षक विलास कदम यांनी सांगितले.

संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

विकास गोरे यांचा अवघ्या दोन वर्षांपूर्वी विकास विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन जुळ्या चिमुकल्या मुली आहेत. त्यांच्या निधनाने गोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खड्ड्यांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यांना जबाबदार संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईक व नागरिकांनी केली आहे.दरम्यान त्यांच्यावर बामणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोरे यांच्या पत्नीला पालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी

ठाणे महापालिकेने सर्व जवानांचा २५ लाखांचा विमा काढलेला आहे. त्यानुसार विकास गोरे यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमानुसार त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत नोकरी दिली जाईल त्यांच्या वारसाला इतर अनुज्ञेय लाभ मिळतील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विकास गोरे यांचा जीव घेणारा खड्डा बुजवला पण बाकीच्या खड्ड्यांचे काय?

विकास गोरे यांचा जीव घेणारा खड्डा अपघातानंतर काही तासांतच सोमवारी बुजविण्यात आला. अपघातापूर्वीच हा खड्डा दुरुस्त केला असता, तर आज विकास आपल्या कुटुंबासोबत असते, अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिली.

तसेच वाहनचालक आणि स्थानिक संघटनांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “टोल नाक्यावर पैसे न दिल्यास वाहन सोडले जात नाही, मग महामार्गावरील हे धोकादायक खड्डे प्रशासनाला दिसत नाहीत का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एकेक खड्डा बुजवून हा प्रश्न सुटणारा नाही. संपूर्ण मुंबई-नाशिक महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या खात्यात लवकरच १,५०० चा हप्ता जमा होण्याची…

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस…

Leave a Reply

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा